अकोल्यातील मूर्तिजापूर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमानिमित्त आमदार रोहित पवार आले होते. त्यावेळी चारचाकी गाडीतून उतरून थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बुलेट गाडी घेतली आणि संपूर्ण मूर्तिजापूर शहरातून बुलेटवर फेरफटका मारला, यावेळी युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मूर्तिजापूर येथील मुख्य मार्गावरून रोहित पवार यांनी दुचाकी तर चालवली पण अमरावतीवरून येताना स्वतः चारचाकी गाडी चालवत मूर्तिजापूर येथे आले होते.